Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी परमपूज्य मोरन मोर इग्नाटियस अफ्रेम II यांची भेट घेतली


नवी दिल्‍ली, 27 फेब्रुवारी 2026

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, अँटिऑक आणि ऑल द ईस्टचे पॅट्रिआर्क तसेच युनिव्हर्सल सिरियाक ऑर्थोडॉक्स चर्चचे सर्वोच्च प्रमुख परमपूज्य मोरन मोर इग्नाटियस अफ्रेम II यांची भेट घेऊन सन्मानित झाल्याची भावना व्यक्त केली.

या भेटीदरम्यान उभयतांमध्ये विविध विषयांवर सविस्तर आणि अर्थपूर्ण चर्चा झाली.

पंतप्रधानांनी एक्स या समाज माध्यमावर लिहिले:

“अँटिऑक आणि ऑल द ईस्टचे पॅट्रिआर्क तसेच युनिव्हर्सल सिरियाक ऑर्थोडॉक्स चर्चचे सर्वोच्च प्रमुख परमपूज्य  मोरन मोर इग्नाटियस अफ्रेम द्वितीय  यांची भेट घेण्याचा मला सन्मान लाभला.

विविध विषयांवर आमची उत्कृष्ट चर्चा झाली.”

 

* * *

निलिमा चितळे/गजेंद्र देवडा/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai