पीएम्इंडिया
नवी दिल्ली, 19 मे 2026
नॉर्डिक देशांचे नेते आणि प्रतिनिधी,
माध्यमांतील मित्रगण,
तुम्हा सर्वांना नमस्कार!
तिसऱ्या भारत-नॉर्डिक शिखर परिषदेत सहभागी होताना मला आज अत्यंत आनंद होत आहे. सर्वप्रथम, या शिखर परिषदेचे आयोजन केल्याबद्दल मी नॉर्वेच्या पंतप्रधानांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो. तसेच, इथे उपस्थित असलेल्या सर्व नॉर्डिक नेत्यांचेही मी स्वागत करतो.
लोकशाही, कायद्याचे राज्य आणि बहुपक्षीयतेप्रति असलेली सामायिक वचनबद्धता आपल्या दोन्ही देशांना नैसर्गिक भागीदार बनवते. तंत्रज्ञान व शाश्वतता यांमधील सामायिक प्राधान्यक्रम आपल्या संबंधांना अनेक संधी देऊन परिपूर्ण करतात. म्हणूनच, आठ वर्षांपूर्वी, नॉर्डिक देशांसोबतच्या संबंधांना अधिक ऊर्जा देण्यासाठी आणि गती देण्यासाठी आपण ही शिखर परिषद घेत आहोत.
मित्रांनो,
मला अत्यंत आनंद होत आहे की, गेल्या काही वर्षांत परस्पर संबंधांमध्ये लक्षणीय प्रगती झाली आहे. गेल्या 10 वर्षांत द्विपक्षीय व्यापार जवळपास चार पटीने वाढला आहे.
नॉर्डिक देशांकडून येणारा गुंतवणूक निधीसुद्धा भारताच्या जलद विकासात निर्णायक भागीदारी रचत आहे. गेल्या दशकात, नॉर्डिक देशांद्वारे भारतात होणारी गुंतवणूक जवळपास 200 टक्क्यांनी वाढली आहे.
वेगाने वाढणाऱ्या व्यापार आणि गुंतवणुकीमुळे केवळ भारताच्या विकासालाच हातभार लागला नाही, तर नॉर्डिक देशांच्या अर्थव्यवस्थेमध्येही अत्यंत सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत. यामुळे हजारो नवीन रोजगार निर्माण झाले आहेत. या मजबूत पायावर, आपले संबंध पुढील टप्प्यावर नेण्यासाठी आम्ही अलीकडेच काही महत्त्वपूर्ण उपक्रमही हाती घेतले आहेत.
मित्रांनो,
ऑक्टोबर 2025 पासून, आम्ही नॉर्वे, आइसलँड आणि इतर EFTA देशांसोबत व्यापार आणि आर्थिक भागीदारी कराराची अंमलबजावणी केली आहे. काही महिन्यांपूर्वीच, आम्ही भारत-युरोपीय महसंघ यांच्यातल्या मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी केली, ज्यामध्ये डेन्मार्क, फिनलँड आणि स्वीडन यांचाही समावेश आहे. या महत्त्वाकांक्षी व्यापार करारांमुळे, आम्ही भारत आणि नॉर्डिक देशांमधील संबंधांमध्ये नव्या सुवर्णयुगाचा आरंभ करत आहोत.
आज आपण भारत आणि नॉर्डिक संबंधांना हरित तंत्रज्ञान आणि नवोन्मेष धोरणात्मक भागीदारीचे रूप देण्याचा निर्णय घेतला आहे. या हरित तंत्रज्ञान भागीदारीतून आपण आईसलँडची भू-औष्णिक मत्स्य-व्यवसाय केंद्रे, नॉर्वेची नील अर्थव्यवस्था आणि आर्कटिकसह सर्व नॉर्डिक देशांतील सागरविषयक व शाश्वततेतील नैपुण्याला भारताच्या संख्यात्मक व्याप्तीशी जोडून घेऊन संपूर्ण जगासाठी आणखी चांगल्या भविष्याची उभारणी करू शकतो.
आणि आपल्यात ही वैशिष्ट्यपूर्ण धोरणात्मक भागीदारी प्रस्थापित होण्यामुळे आपण स्वीडनचे प्रगत उत्पादन व संरक्षण, फिनलँडचे दूरसंदेशवहन व डिजिटल तंत्रज्ञान, आणि डेन्मार्कची सायबर सुरक्षा व आरोग्य-तंत्रज्ञान यांना भारताच्या प्रतिभेशी जोडून साऱ्या जगासाठी समस्यांचे विश्वासार्ह समाधान शोधून काढू शकू.
मित्रांनो,
आपले संशोधन आणि नवोन्मेष क्षेत्रातील व्यापक संबंध हाही भारत-नॉर्डिक भागीदारीचा एक महत्वपूर्ण स्तंभ आहे. ते बळकट करण्यासाठी आपण एकत्रितपणे विद्यापीठे, प्रयोगशाळा आणि स्टार्ट-अप व्यवस्थेमधले दुवे वाढवत जाऊ. आपण आर्क्टिक आणि ध्रुवीय संशोधनात आपला सहयोग आणखी दृढ करू. आणि भारत व नॉर्डिक देशांदरम्यान कौशल्यविकास आणि प्रतिभावंतांच्या देवघेवीच्या नव्या संधी उत्पन्न करण्याची काळजी घेऊया.
मित्रांनो,
आज आम्ही सर्वांनी मिळून जागतिक मुद्द्यांवरही विचारांचे आदान-प्रदान केले. जागतिक तणाव आणि संघर्षाच्या या काळात भारत व नॉर्डिक देश- आपण एकत्रितपणे एक नियमाधारित जागतिक व्यवस्था बळकट करत राहू आणि युक्रेन असो की पश्चिम आशिया, संघर्षाला लवकरात लवकर पूर्णविराम देण्याचे आणि शांतीच्या प्रयत्नांचे समर्थन करत राहू.
बहुपक्षीय संस्थांमध्ये तातडीने सुधारणा आवश्यक आहेत, यावर आमची सहमती आहे. आणि दहशतवादाबद्दलही आपली भूमिका सुस्पष्ट आणि एकत्वाची आहे– ना तडजोड, ना दुटप्पीपणा !
माननीय महोदय आणि महोदया,
तसे तर आपण सर्वच वेगवेगळ्या भाषा बोलतो. परंतु कधी कधी आपल्या नैसर्गिक भागीदारीला अधोरेखित करण्यासाठी अगदी एक शब्दसुद्धा पुरेसा ठरतो. आज मी अनेकदा ‘संबंध’ हा शब्द वापरला. अनेक नॉर्डिक भाषांमध्ये ‘संबंध’ शब्दाचा अर्थ आहे जोडलेपण, नाते, एक बंध.. हिंदीतही संबंध शब्दाचा अर्थ हाच आहे.
हे केवळ शब्दांमधील साम्य नाही. तर यातून आपल्या विचारांमधील जवळीक दिसून येते. या, आपण आपल्यातील संबंध प्रत्येक क्षेत्रात बळकट करूया आणि भारत-नॉर्डिक भागीदारीला सामायिक समृद्धी, नवोन्मेष आणि शाश्वत भविष्याचे एक आदर्श रूप देऊया.
मनःपूर्वक धन्यवाद !
* * *
राधिका अघोर/पर्णिका हेदवकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com
/PIBMumbai
/pibmumbai
Sharing my remarks during the joint press meet with leaders of Nordic nations. https://t.co/Kfpxw9AByU
— Narendra Modi (@narendramodi) May 19, 2026
Democracy, rule of law और multilateralism के प्रति हमारी साझा प्रतिबद्धता, हमें natural partners बनाती हैं।
— PMO India (@PMOIndia) May 19, 2026
और technology और sustainability में हमारी shared priorities, हमारे संबंधों को अवसरों से भर देती है: PM @narendramodi
अक्टूबर 2025 से, नॉर्वे, आइसलैंड और अन्य EFTA देशों के साथ, हमने Trade and Economic Partnership Agreement लागू किया।
— PMO India (@PMOIndia) May 19, 2026
और कुछ ही महीने पहले, हमने भारत-यूरोपियन यूनियन Free Trade Agreement किया, जिसमें डेनमार्क, फिनलैंड और स्वीडन भी भागीदार हैं।
इन महत्वाकांक्षी trade agreements…
वैश्विक तनाव और संघर्ष के इस दौर में, भारत और नॉर्डिक देश साथ मिलकर, एक rules-based global order को बल देते रहेंगे।
— PMO India (@PMOIndia) May 19, 2026
और यूक्रेन हो या वेस्ट एशिया, हम संघर्ष की शीघ्र समाप्ति और शांति के प्रयासों का समर्थन करते रहेंगे: PM @narendramodi
हम इस बात पर सहमत हैं कि multilateral institutions का reform आवश्यक भी है और urgent भी।
— PMO India (@PMOIndia) May 19, 2026
और terrorism पर भी हमारा clear और
united stand है- No compromise. No double standards: PM @narendramodi
आज मैने कई बार, “संबंध” शब्द का प्रयोग किया।
— PMO India (@PMOIndia) May 19, 2026
कई नॉर्डिक भाषाओं में “संबंध” शब्द का अर्थ है, connection, relations, एक bond.
हिन्दी में भी “संबंध” का अर्थ यही है।
यह केवल शब्दों की समानता नहीं है।
यह हमारे विचारों की निकटता को दर्शाता है: PM @narendramodi
PM @narendramodi participated in the 3rd India-Nordic Summit in Oslo. It reflected the expanding scope and growing strength of India’s partnership with the Nordic region. The leaders discussed cooperation in sustainability, innovation, clean energy, emerging technologies and… pic.twitter.com/xXUO1YsgZF
— PMO India (@PMOIndia) May 19, 2026
India and the Nordic nations have made exceptional progress in the last few years. Trade ties have grown stronger and investment linkages have deepened significantly.
— Narendra Modi (@narendramodi) May 19, 2026
One of the most significant outcomes of today’s India-Nordic Summit is our decision to elevate our ties to a… pic.twitter.com/cMuESYaXxm