Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी खऱ्या ज्ञानाच्या परिवर्तन घडवण्याच्या शक्तीवर प्रकाश टाकणारे एक संस्कृत सुभाषित सामायिक केले


पंतप्रधान, नरेंद्र मोदी म्हणाले की, खरे ज्ञान राष्ट्र, समाज आणि संपूर्ण मानवतेच्या कल्याणाचा मार्ग प्रशस्त करत असते.  आपले ज्ञान आणि कृती संपूर्ण मानवजातीसाठी प्रेरणास्रोत होणे महत्त्वाचे आहे. असेही त्यांनी म्हटले आहे.

पंतप्रधानांनी एक संस्कृत सुभाषित सामायिक केले –

“आत्मा शुद्धः सदा नित्यः सुखरूपः स्वयम्प्रभः।

अज्ञानान्मलिनो भाति ज्ञानाच्छुद्धो भवत्ययम्‌।। ”

या सुभाषितानुसार,  आत्मा नैसर्गिकपणे नेहमीच शुद्ध, शाश्वत, आनंदमय आणि स्वयंप्रकाशित असतो. तथापि, अज्ञानामुळे तो अशुद्ध दिसतो; खऱ्या ज्ञानाच्या आधारे तो पुन्हा आपले खरे शुद्ध स्वरूप प्रकट करतो.

पंतप्रधानांनी एक्स या समाजमाध्यमावर लिहिले की,

खऱ्या  ज्ञानामुळे देश, समाज आणि संपूर्ण मानवतेच्या कल्याणाचा मार्ग प्रशस्त होतो. त्यामुळे आपले ज्ञान आणि आपली कर्मे संपूर्ण मानवजातीसाठी प्रेरणादायी ठरणे आवश्यक आहे.

आत्मा शुद्धः सदा नित्यः सुखरूपः स्वयम्प्रभः।
अज्ञानान्मलिनो भाति ज्ञानाच्छुद्धो भवत्ययम्‌।।”

***

NehaKulkarni / RajeshShirbhate / DineshYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai