Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये ज्युडो या क्रीडा प्रकारात रौप्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी यामिनी मौर्य यांचे अभिनंदन केले


 

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये ज्युडो या क्रीडा प्रकाराच्या 57 किलो वजनी गटात रौप्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी यामिनी मौर्य यांचे अभिनंदन केले आहे.

यामिनी मौर्य यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आणि यामधून त्यांचा ज्युडो या खेळाबद्दलचा ध्यास स्पष्टपणे दिसून आला, असे त्यांनी म्हटले आहे.

त्यांची ही कामगिरी अनेक युवकांना ज्युडो या खेळाकडे वळण्याची प्रेरणा देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधानांनी X वरील पोस्ट मध्ये म्हटले आहे:

“ज्युडो च्या 57 किलो वजनी गटात रौप्यपदक जिंकल्याबद्दल यामिनी मौर्य हिचे अभिनंदन! ती खूप छान खेळली आणि तिच्या कामगिरीतून ज्युडो या खेळाबद्दलचा तिचा ध्यास स्पष्टपणे दिसून आला. तिच्या या कामगिरीमुळे भविष्यात अनेक युवक ज्युडो या खेळाकडे आकर्षित होतील. तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

#CWG2026” 

***

यश राणे/राजश्री आगाशे/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]