Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

आशियाई क्रीडा स्पर्धेतील महिलांच्या डिंगी नौकानयन स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांकडून नेत्रा कुमाननचे अभिनंदन


 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेतील महिलांच्या डिंगी नौकानयन स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याबद्दल नेत्रा कुमाननचे अभिनंदन केले आहे.

पंतप्रधानांनी म्हटले आहे की भारतासाठी ही निश्चितच मोठी कामगिरी आहे.

मोदी यांनी नेत्रा कुमाननला तिच्या पुढील यशासाठी शुभेच्छा दिल्या असून, देशातील नव्या पिढीतील खेळाडूंना ती प्रेरणा देईल, अशी आशा व्यक्त केली आहे.

पंतप्रधान कार्यालयाने ‘X’वरील पोस्टमध्ये म्हटले आहे;

“आशियाई क्रीडा स्पर्धेतील महिलांच्या डिंगी नौकानयन स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याबद्दल नेत्रा कुमाननचे अभिनंदन! भारतासाठी ही निश्चितच मोठी कामगिरी आहे. तिने यापुढेही नवनवी शिखरे गाठावीत आणि देशातील नव्या पिढीतील खेळाडूंना प्रेरणा द्यावी, अशी शुभेच्छा : पंतप्रधान @narendramodi”

***

माधुरी पांगे/हेमांगी कुलकर्णी/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai