पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐची-नागोया येथे आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या भारतीय पथकाला शुभेच्छा दिल्या आहेत. मोदी म्हणाले की, भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रत्येक खेळाडूने अफाट मेहनत घेतली आहे आणि संपूर्ण देशाला त्यांचा अभिमान आहे.
मोदी यांनी एक्स या समाजमाध्यमावर लिहिले आहे की,
ऐची-नागोया येथे आशियाई क्रीडा स्पर्धेला सुरुवात होत असताना, भारतीय पथकाला माझ्या हार्दिक शुभेच्छा. प्रत्येक खेळाडूने अफाट मेहनत घेतली आहे आणि उल्लेखनीय समर्पण व दृढनिश्चय दाखवला आहे. भारताला त्यांचा अभिमान आहे.
त्यांनी सर्वोत्तम कामगिरी करावी, चांगला खेळ करावा आणि चमकावे !
As the Asian Games commence in Aichi-Nagoya, my best wishes to the Indian contingent. Each athlete has worked incredibly hard and shown remarkable dedication and determination. India is proud of them.
May they give their best, play well and shine! https://t.co/FYokK9OTWK
— Narendra Modi (@narendramodi) September 19, 2026
***
सुषमा काणे/राजेश शिरभाते/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com [
0KB ]