पीएम्इंडिया
आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या कंपाऊंड सांघिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल कुशल दलाल, साहिल राजेश जाधव आणि गणेश मणिरत्नम थिरुमुरू यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.
रोमहर्षक अंतिम सामन्यात या तिघांनी सुवर्णपदक जिंकले असे सांगून, त्यांची अचूकता आणि सांघिक खेळाच्या उत्कृष्ट कामगिरीची पंतप्रधानांनी प्रशंसा केली.
पंतप्रधान मोदी यांनी या विजेत्या तिरंदाजांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
पंतप्रधान कार्यालयाने X वर पोस्ट केले आहे:
“कुशल दलाल, साहिल राजेश जाधव आणि गणेश मणिरत्नम थिरुमुरू यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या कंपाऊंड सांघिक प्रकारात रोमहर्षक अंतिम फेरीनंतर सुवर्णपदक जिंकले. त्यांनी अचूकता आणि सांघिक खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन केले. आपल्या विजेत्या तिरंदाजांचे अभिनंदन. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा: पीएम @narendramodi”
Kushal Dalal, Sahil Rajesh Jadhav and Ganesh Maniratnam Thirumuru clinched Gold in the Men’s Compound Team event at the Asian Games after a thrilling final. Theirs was a superb show of accuracy and teamwork. Congratulations to our champion archers. Best wishes for their future endeavours: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) September 30, 2026
***
राधिका अघोर/राजश्री आगाशे/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com [
0KB ]
Kushal Dalal, Sahil Rajesh Jadhav and Ganesh Maniratnam Thirumuru clinched Gold in the Men’s Compound Team event at the Asian Games after a thrilling final. Theirs was a superb show of accuracy and teamwork. Congratulations to our champion archers. Best wishes for their future…
— PMO India (@PMOIndia) September 30, 2026