नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नीती आयोगाचे उपाध्यक्ष अशोक कुमार लाहिरी यांचा भारतातील कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा कवचाचा विस्तार याविषयीचा लेख सामायिक केला.
लाहिरी यांनी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) योजनेसाठी वेतनाची कमाल मर्यादा वाढवण्याच्या निर्णयाचे महत्त्व अधोरेखित केले. या वाढीमुळे अधिकाधिक कामगारांना भविष्य निर्वाह निधी, निवृत्तीवेतन आणि विमा संरक्षणाच्या कक्षेत आणता येईल, असे त्यांनी नमूद केले. सामाजिक सुरक्षा सुविधांचे कवच अधिक व्यापक झाल्यामुळे कर्मचाऱ्यांना नोकरीत टिकवून ठेवणे, कामगारवर्गात स्थिरता निर्माण करणे आणि अधिकाधिक रोजगार औपचारिक क्षेत्राच्या कक्षेत आणणे शक्य होईल, असेही त्यांनी नमूद केले.
पंतप्रधान कार्यालयाने ‘एक्स’ या समाजमाध्यमावर पुढीलप्रमाणे टिप्पणी केली आहे :
“भारतातील कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा कवचाचा विस्तार.
नीती आयोगाचे उपाध्यक्ष अशोक कुमार लाहिरी यांनी कर्मचारी भविष्य निर्वाह निधीसाठी (EPF) वेतनाची कमाल मर्यादा वाढवण्याचे महत्त्व स्पष्ट केले. या निर्णयामुळे अधिकाधिक कामगारांना भविष्य निर्वाह निधी, निवृत्तीवेतन आणि विमा संरक्षणाचा लाभ मिळू शकेल, असे त्यांनी नमूद केले.
या व्यापक सामाजिक सुरक्षा कवचामुळे कर्मचाऱ्यांना नोकरीत टिकवून ठेवणे, कामगारवर्गात स्थैर्य निर्माण करणे आणि अधिकाधिक रोजगार औपचारिक क्षेत्राच्या कक्षेत आणणे शक्य होईल, असे त्यांनी नमूद केले आहे.”
Expanding social security coverage for India’s workforce.
Vice Chairman of @NITIAayog, Shri Ashok Kumar Lahiri, writes about the increase in the EPF wage ceiling and its role in bringing more workers under provident fund, pension and insurance protection.
He discusses how wider coverage will support employee retention, workforce stability and greater formalisation of employment.
https://t.co/j4oWiFidwL
via NaMo App
— PMO India (@PMOIndia) November 25, 2026
सुवर्णा बेडेकर/आशुतोष सावे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
Expanding social security coverage for India's workforce. Vice Chairman of @NITIAayog, Shri Ashok Kumar Lahiri, writes about the increase in the EPF wage ceiling and its role in bringing more workers under provident fund, pension and insurance protection. He discusses how wider coverage will support employee retention, workforce stability and greater formalisation of employment. https://t.co/j4oWiFidwL via NaMo App
— PMO India (@PMOIndia) November 25, 2026