नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारतीय उद्योग महासंघाचे अध्यक्ष आर मुकुंदन यांनी लिहिलेला एक लेख सामायिक केला आहे. या लेखामध्ये विकसित भारत 2047 च्या दिशेने सुरु असलेला भारताचा प्रवास कशाप्रकारे शाश्वत सुधारणा आणि सातत्यपूर्ण गुंतवणुकीने आकार घेत आहे, ते अधोरेखित केले आहे.
मुकुंदन यांनी आपल्या लेखात पायाभूत सुविधा क्षेत्रातील गुंतवणूक, वस्तू आणि सेवा कर, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा, कॉर्पोरेट कर सुधारणा, उत्पादनाशी निगडित प्रोत्साहन योजना आणि व्यापारविषयक करार यांनी घातलेला पाया अधोरेखित केला आहे तसेच भारताच्या वित्तीय क्षमतेचे दीर्घकालीन समृद्धीमध्ये रूपांतर करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकार आणि उद्योगांनी ‘टीम भारत’ म्हणून एकत्रित कार्य करण्याचे महत्त्व देखील सांगितले आहे.
पंतप्रधान कार्यालयाने ‘एक्स’वरील पोस्ट मध्ये लिहिले आहे:
विकसित भारत 2047 च्या दिशेने सुरु असलेला भारताचा प्रवास विविध क्षेत्रातील शाश्वत सुधारणा आणि गुंतवणुकीतून आकार घेत आहे.
भारतीय उद्योग महासंघाचे अध्यक्ष आर. मुकुंदन यांनी पायाभूत सुविधांमधील गुंतवणूक, जीएसटी, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा, कॉर्पोरेट कर सुधारणा, पीएलआय योजना आणि व्यापार करार यांद्वारे घातलेल्या पायाबद्दल लिहिले आहे.
भारताच्या आर्थिक क्षमतेचे चिरस्थायी समृद्धीमध्ये रूपांतर करण्यासाठी सरकार आणि उद्योग यांनी ‘टीम भारत’ म्हणून एकत्र काम करण्याच्या महत्त्वावर त्यांनी प्रकाश टाकला आहे.
India’s journey towards Viksit Bharat 2047 is being shaped by sustained reforms and investment across key sectors.
@FollowCII President R Mukundan writes about the foundations laid through infrastructure investment, GST, digital public infrastructure, corporate tax reforms, PLI schemes and trade agreements.
He highlights the importance of government and industry working together as Team Bharat to turn India’s economic potential into lasting prosperity.
https://t.co/Y5Xq6QGfDA
— PMO India (@PMOIndia) November 25, 2026
नितीन फुल्लुके /भक्ती सोनटक्के/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
India's journey towards Viksit Bharat 2047 is being shaped by sustained reforms and investment across key sectors. @FollowCII President R Mukundan writes about the foundations laid through infrastructure investment, GST, digital public infrastructure, corporate tax reforms, PLI schemes and trade agreements. He highlights the importance of government and industry working together as Team Bharat to turn India's economic potential into lasting prosperity. https://t.co/Y5Xq6QGfDA
— PMO India (@PMOIndia) November 25, 2026