पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, देशाचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांना, त्यांच्या जयंतीनिमित्त श्रद्धांजली वाहिली आहे.
लाल बहादूर शास्त्री यांचे साधे व्यक्तिमत्व आणि देशाप्रतीचे अतूट समर्पण, सर्वांसाठी अत्यंत प्रेरणादायक आहे, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. शास्त्रीजी यांचे सौम्य, निरलस व्यक्तिमत्व प्रत्येक भारतीयासाठी अभिमानास्पद बाब असून, त्यांचा दृढनिश्चय खडकाप्रमाणे अविचल, निश्चल होता, असेही पंतप्रधानांनी पुढे म्हटले आहे.
एक्स वर पंतप्रधानांनी लिहिले आहे ;
“लाल बहादूर शास्त्री यांना विनम्र श्रद्धांजली, त्यांचा साधेपणा आणि समर्पण, संपूर्ण देशासाठी अत्यंत प्रेरणादायक आहे.”
Homage to Lal Bahadur Shastri Ji, whose simplicity and dedication to the nation remain deeply inspiring. https://t.co/edMiRdsf0v
— Narendra Modi (@narendramodi) October 2, 2026
***
शिल्पा पोफळे/राधिका अघोर/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com [
0KB ]
/PIBMumbai
/pibmumbai
Homage to Lal Bahadur Shastri Ji, whose simplicity and dedication to the nation remain deeply inspiring. pic.twitter.com/edMiRdsf0v
— Narendra Modi (@narendramodi) October 2, 2026