Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या 65 किलो फ्रीस्टाइल कुस्तीमध्ये सुवर्णपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी केले सुजीतचे अभिनंदन


आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या 65 किलो फ्रीस्टाइल कुस्तीमध्ये अंतिम फेरीत रोमांचक विजय मिळवत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुजीतचे अभिनंदन केले आहे.

पंतप्रधानांनी सांगितले की आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदार्पणातच सुजीतने या स्पर्धेतील भारताचे पहिले कुस्तीतील सुवर्णपदक जिंकून दिले आहे. हा एक संस्मरणीय विजय असल्याचे त्यांनी सांगितले.

पंतप्रधानांनी सुजीतला आगामी काळासाठी शुभेच्छा दिल्या.

पंतप्रधान कार्यालयाने X वरील पोस्टमध्ये म्हटले आहे:

“आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या 65 किलो फ्रीस्टाइल कुस्तीमध्ये अंतिम फेरीत रोमांचक विजय मिळवत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल सुजीतचे अभिनंदन. आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदार्पणातच त्याने या स्पर्धेतील भारताचे पहिले कुस्तीतील सुवर्णपदक जिंकून दिले आहे. हा खरोखरच संस्मरणीय विजय आहे! आगामी काळासाठी त्याला मनःपूर्वक शुभेच्छा: पंतप्रधान नरेंद्र मोदी”

***

माधुरी पांगे/गजेंद्र देवडा/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]