पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये महिलांच्या सांघिक गोल्फमध्ये रौप्यपदक जिंकल्याबद्दल अदिती अशोक, प्रणवी शरथ उर्स आणि दीक्षा डागर यांचे अभिनंदन केले आहे.
पंतप्रधानांनी सांगितले की, त्यांचे यश खेळाप्रती त्यांचा दृढनिश्चय आणि उत्कटता अधोरेखित करते.
मोदी यांनी अदिती अशोक, प्रणवी शरथ उर्स आणि दीक्षा डागर यांना भविष्यातील यशासाठी शुभेच्छा दिल्या असून, आगामी काळात त्यांनी यशाची नवी शिखरे गाठावीत, अशी आशा व्यक्त केली.
पंतप्रधान कार्यालयाने ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले आहे;
“काल आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये महिलांच्या सांघिक गोल्फमध्ये रौप्यपदक जिंकल्याबद्दल अदिती अशोक, प्रणवी शरथ उर्स आणि दीक्षा डागर यांचे अभिनंदन. हे यश खेळाप्रती त्यांचा दृढनिश्चय आणि उत्कटता अधोरेखित करते. आगामी काळात त्यांनी यशाची नवी शिखरे गाठत राहावे, अशा शुभेच्छा: पंतप्रधान @narendramodi”
Kudos to Aditi Ashok, Pranavi Sharath Urs and Diksha Dagar on winning the Silver Medal in the Women’s Team Golf event at the Asian Games 2026 yesterday. This success highlights their determination and passion for the sport. May they continue to attain new heights of success in the times to come: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) October 4, 2026
***
आशिष सांगळे/हेमांगी कुलकर्णी/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com [
0KB ]