Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

भारतीय कृषीक्षेत्रातील परिवर्तनाविषयीचा एक लेख पंतप्रधानांनी केला सामायिक


भारतीय कृषीक्षेत्रातील परिवर्तनावरावर आधारित, अशोक गुलाटी यांनी लिहिलेला एक लेख आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामायिक केला आहे. गुजरात मधील कृषीक्षेत्राच्या परिवर्तनापासून ते भारतीय कृषीक्षेत्राच्या व्यापक परिवर्तनापर्यंतचा  मोदी यांचा 25 वर्षांचा प्रवास यात अधोरेखित करण्यात आला आहे.उत्तम सिंचन व्यवस्था, विश्वासार्ह वीजपुरवठा, ग्रामीण रस्ते, तंत्रज्ञान आणि बाजारपेठेची उपलब्धता यांमुळे शेतकऱ्यांना त्यांची उत्पादकता आणि उत्पन्न वाढविण्यात कशी मदत झाली, हे या लेखातून दर्शविण्यात आले आहे. 

 पंतप्रधान कार्यालयाने आपल्या एक्स पोस्टवर लिहिले आहे; पंतप्रधान @narendramodi यांचा गुजरात मधील कृषीक्षेत्राच्या परिवर्तनापासून ते भारतीय कृषीक्षेत्राच्या व्यापक परिवर्तनापर्यंतचा 25 वर्षांचा प्रवास हा उत्तम सिंचन व्यवस्था, विश्वासार्ह वीजपुरवठा, ग्रामीण रस्ते, तंत्रज्ञान आणि बाजारपेठेची उपलब्धता यांमुळे शेतकऱ्यांना त्यांची उत्पादकता आणि उत्पन्न वाढवण्यास कशी मदत झाली, हे दर्शवतो.

शेतकऱ्यांना थेट सहाय्य, पिकांतील वैविध्य आणि उत्तम ग्रामीण पायाभूत सुविधा यामुळे राष्ट्रीय स्तरावर,या दृष्टिकोनाचा विस्तार झाला आहे.

भारतीय कृषीक्षेत्राच्या परिवर्तनावरील आवर्जून वाचावा असा लेख.

https://www.business-standard.com/opinion/columns/from-gujarat-s-agrarian-miracle-to-india-s-farm-transformation-126100601522_1.html

***

Ashish Sangle / Sampada Patgaonkar / Dinesh Yadav

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai