Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समर्पित सेवाभावाच्या सद्गुणावर भर देणारे संस्कृत सुभाषित केले सामायिक


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज समर्पित सेवाभाव, सदाचरण आणि कर्तव्याप्रती असलेल्या बांधिलकीचे महत्त्व अधोरेखित करणारे संस्कृत सुभाषित सामायिक केले आहे.

“नित्यं परिचरेच्चैव तद्वै सुकृतमुत्तमम्।

कीर्तिं पुण्यं यशो लोकान् प्राप्स्यसे राजसत्तम।।”

या सुभाषितातून इतरांची सेवा करणे आणि आपली कर्तव्ये प्रामाणिकपणे पार पाडणे हे उत्तम आचरणाचे सर्वोच्च स्वरूप असल्याचे अधोरेखित केले आहे. अशा समर्पित सेवेमुळे केवळ पुण्य आणि सद्भावना प्राप्त होत नाही, तर समाजात चिरस्थायी सन्मान आणि मान्यताही मिळते.

पंतप्रधानांनी ‘एक्स’ या समाजमाध्यमावरील  पोस्ट मध्ये म्हटले आहे:

नित्यं परिचरेच्चैव तद्वै सुकृतमुत्तमम्।

कीर्तिं पुण्यं यशो लोकान् प्राप्स्यसे राजसत्तम।।

 ***

Ashish Sangle / Bhakti Sontakke / Dinesh Yadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai