Search

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी परमोदचे केले अभिनंदन


नवी दिल्‍ली, 23 ऑक्‍टोबर 2026 

 

आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या 1500 मीटर T46 स्पर्धेत, रौप्य पदक पटकावल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परमोदचे अभिनंदन केले आहे.

गेल्या वर्षी देखील त्याने रौप्य पदक मिळवले होते, त्याच यशाची यंदाही पुनरावृत्ती झाली, ही उत्तम कामगिरी असल्याचे सांगत, या पुढेही तो आपल्या खेळात अधिकाधिक प्राविण्य मिळवून इतर खेळाडूंना प्रेरणा देईल, अशी आशा पंतप्रधानांनी व्यक्त केली.

एक्स वर पंतप्रधान कार्यालयाने लिहिलेल्या संदेशात म्हटले आहे:

“आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या 1500 मीटर T46 स्पर्धेत, रौप्य पदक पटकावल्याबद्दल परमोदचे अभिनंदन! गेल्या वर्षीप्रमाणेच, यंदाही आपले रौप्य पदक कायम राखण्यात यशस्वी ठरणे, ही चांगली उपलब्धी आहे. तो यापुढेही आपल्या खेळात अधिकाधिक निपुण होत, त्याच्या कामागिरीने इतरांना प्रेरणा देत राहो, हीच शुभेच्छा: PM @narendramodi”

 

* * *

राधिका अघोर/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai