Search

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी भारताच्या मेट्रो नेटवर्कचा विस्तार अधोरेखित केला; 2014 मधील 248 किमीवरून आज सुमारे 1,200 किमीपर्यंत विस्तार


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील मेट्रो नेटवर्कचा लक्षणीय विस्तार अधोरेखित केला. त्यांनी नमूद केले की, 2014 मध्ये देशात केवळ पाच शहरांमध्ये 248 किमी लांबीचे मेट्रो मार्ग होते, जे  आज 26 शहरांमध्ये सुमारे 1,200 किमी पर्यंत विस्तारलेले आहे.

पंतप्रधान म्हणाले  की, दररोज एक कोटीहून अधिक लोक मेट्रोने प्रवास करतात. या विस्तारामुळे वाहतूक कोंडीतला वेळ वाचतो, कुटुंबासोबत अधिक वेळ घालवता येतो, उत्पादकता वाढते आणि उत्तम संधी उपलब्ध होतात.

मोदी म्हणाले की, शहरी भारतासाठी सरकार अशाच प्रकारच्या बदलाच्या दिशेने काम करत आहे.

पंतप्रधानांनी ‘एक्स’ वर लिहिले;

“मला  तुम्हाला विचारायचे आहे …

जर भारतातील मेट्रो नेटवर्कचा विस्तार 2014 पूर्वीच्या गतीनेच सुरू राहिला असता, तर पुणे सारख्या शहरांना मेट्रो येण्यासाठी किती वाट पाहावी लागली असती?

वर्षे… नाही… कदाचित अनेक दशके!

आणि हे अजिबात स्वीकारार्ह नव्हते.

2014 मध्ये, भारतात केवळ 5 शहरांमध्ये 248 किमी लांबीचे मेट्रो मार्ग होते.

आज, आपल्याकडे 26 शहरांमध्ये सुमारे 1,200 किमी लांबीचे मेट्रो जाळे आहे.

दररोज 1 कोटीहून अधिक लोक मेट्रोने प्रवास करतात.

याचा प्रभाव केवळ आकडेवारीपुरता मर्यादित नाही.

याचा अर्थ असा की, वाहतूक कोंडीत वाया जाणारा वेळ वाचतो, कुटुंबासोबत अधिक वेळ घालवता येतो, उत्पादकता वाढते आणि उत्तम संधी उपलब्ध होतात.

शहरी भारतासाठी आम्ही याच परिवर्तनाच्या दिशेने काम करत आहोत!”

*** 

Nitin Fulluke / Sushma Kane / Madhura Nerurkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai