Search

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांकडून  नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा;  हा सण अंधारावर विजय मिळवण्याच्या  संकल्पाचे प्रतीक असल्याचे केले नमूद


 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवाळीच्या निमित्ताने सर्व नागरिकांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

प्रकाशाचा हा सण संपूर्ण देशाला प्रकाशमान करतो आणि अंधारावर मात करण्याच्या संकल्पाचे प्रतिबिंब दर्शवतो, असे पंतप्रधानांनी सांगितले. हा सण आणि येणारा काळ सर्वांसाठी आनंद, शांती आणि समृद्धी घेऊन येवो, अशा शुभेच्छा त्यांनी व्यक्त केल्या. 

मोदी यांनी सांगितले की, ते दिवाळी मोठ्या उत्साहाने साजरी करतात आणि मागील वर्षांप्रमाणेच यंदाही देशातील शूर सैनिकांसोबत हा सण साजरा करण्याची परंपरा ते कायम ठेवतील.

दिवाळीच्या शुभेच्छांचा व्हिडिओ संदेश सामाईक करताना पंतप्रधानांनी एक्सवर लिहिले :

“सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!”

***

सुषमा काणे/गजेंद्र देवडा/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai