Search

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

आसाममधील गोलाघाट जिल्ह्यात झालेल्या दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसाममधील गोलाघाट जिल्ह्यात झालेल्या दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. या दुःखद प्रसंगी शोकाकुल कुटुंबीयांप्रति संवेदना व्यक्त करत त्यांनी जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना केली.

या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या प्रत्येक कुटुंबातील जवळच्या नातेवाइकांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून (पीएमएनआरएफ) दोन लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा पंतप्रधानांनी केली आहे. तसेच जखमींना 50,000 रुपयांची मदत दिली जाणार आहे.

पंतप्रधान कार्यालयाने एक्सवर पोस्ट केले:

“आसाममधील गोलाघाट जिल्ह्यात झालेल्या दुर्घटनेतील जीवितहानीमुळे अत्यंत दुःख झाले आहे. या दुःखद प्रसंगी शोकाकुल कुटुंबीयांप्रति मी संवेदना व्यक्त करतो. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना करतो.

दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबियांना  पीएमएनआरएफमधून दोन लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान दिले जाईल. जखमींना 50,000 रुपये दिले जातील : पंतप्रधान नरेंद्र मोदी”

***

Radhika Aghor / Gajendra Deoda / Madhura Nerurkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai