Search

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

राजस्थानमधील कोटा येथे झालेल्या दुर्घटनेत जीवितहानी झाल्याबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक


नवी दिल्‍ली, 21 नोव्‍हेंबर 2026

 

राजस्थानमधील कोटा येथे झालेल्या दुर्घटनेत जीवितहानी झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांप्रति संवेदना व्यक्त केल्या असून जखमी व्यक्ती लवकर बऱ्या होण्यासाठी प्रार्थना केली आहे.

पंतप्रधानांनी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून (पीएमएनआरएफ) प्रत्येक मृत व्यक्तीच्या निकटवर्तीयांना 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपये सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा केली आहे.

पंतप्रधानांनी एक्सवरील पोस्टमध्ये सांगितले;

“राजस्थानमधील कोटा येथे झालेल्या दुर्दैवी दुर्घटनेत जीवितहानी झाल्याचे समजून दुःख झाले. या दुःखाच्या प्रसंगी माझ्या संवेदना मृतांच्या कुटुंबीयांसोबत आहेत. जखमी व्यक्ती लवकरात लवकर बऱ्या होवोत, अशी प्रार्थना करतो.

या दुर्घटनेत जीव गमावलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या निकटवर्तीयांना पीएमएनआरएफमधून 2 लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान दिले जाईल. जखमींना 50,000 रुपये दिले जातील: पंतप्रधान @narendramodi”

 

* * *

नेहा कुलकर्णी/गजेंद्र देवडा/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai