पीएम्इंडिया
माहिती – तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील सहकार्याला चालना देण्यासाठी भारत आणि सर्बिया यांच्यात झालेल्या पूर्वोत्तर प्रकल्प सामंजस्य कराराला, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
माहिती तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात भारत आणि सर्बियामधल्या सहकार्याला चालना देणे, सरकारे, खासगी संस्था, क्षमता बांधणी संस्था आणि दोन्ही देशातल्या माहिती तंत्रज्ञान व इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील सरकारी आणि खासगी संस्था यांच्यातील सहकार्य वृद्धिंगत करणे हा या करारामागचा हेतू आहे.
B.Gokhale/S.Kulkarni/P.Malandkar