Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

एक्झिम बँकेत भांडवल ओतण्याला कार्योत्तर मंजुरी


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने, एक्झिम बँकेत 800 कोटी रुपये भांडवल ओतण्याला आज कार्योत्तर मंजुरी दिली. बँकेच्या भविष्यातील वाटचालीला मदत म्हणून अर्थमंत्र्यांनी मंजुरी दिली होती.

पार्श्वभूमी-

निर्यातदार आणि आयातदारांना अर्थसहाय्य पुरवण्यासाठी आणि वस्तू आणि सेवांच्या आयात-निर्यातीबाबत समन्वय साधण्यासाठी प्रमुख आर्थिक संस्था म्हणून कार्य करण्यासाठी 1982 मध्ये वैधानिक महामंडळ म्हणून एक्झिम बँकेची स्थापना करण्यात आली. देशाच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराला प्रोत्साहन देण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले.

S. Kane/S.Tupe