पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरु रविदास यांच्या जयंतीनिमित्त त्यांना श्रध्दांजली अर्पण केली आहे. “समाजातील वाईट प्रवृत्ती नष्ट व्हाव्यात आणि सामाजिक बंधूभाव वृध्दीस लागावा, यासाठी महान संत रविदास यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. रविदास यांची शिकवण समाजासाठी प्रेरणास्रोत आहे. आज रविदास यांच्या जयंतीनिमित्त त्यांना शतश: नमन”, असे पंतप्रधान मोदी यांनी आपल्या संदेशामध्ये म्हटले आहे.