Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

भारत आणि अर्मेनिया यांच्यातील बाह्य अंतराळाचा शांततापूर्ण वापरातील सहकार्यासंबंधी सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाला भारत आणि अर्मेनिया यांच्यातील बाह्य अंतराळाचा शांततापूर्ण वापरातील सहकार्यासंबंधी सामंजस्य कराराबाबत माहिती देण्यात आली.

एप्रिल २०१७ मध्ये या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या होत्या.

या करारामुळे अंतराळ विज्ञान, तंत्रज्ञान, रिमोट सेन्सिंग, उपग्रह दळणवळण आणि उपग्रह आधारित दिशादर्शक प्रणाली, अंतराळ यानाचा वापर यासारख्या क्षेत्रात सहकार्य शक्य होईल. याचा लाभ दोन्ही देशांच्या घटकांना होईल.
या करारान्वये भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे सदस्य आणि अर्मेनियाच्या शिक्षण आणि विज्ञान मंत्रालयाच्या राज्य विज्ञान समितीचे सदस्य यांचा संयुक्त कृती गट स्थापन केला जाईल , जो पुढील कृती आराखडा ठरवेल.

B.Gokhale/S.Kane/Anagha