Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान मोदी यांचे इस्त्रायलमध्ये आगमन; बेन गुरीयन विमानतळावर भव्य पारंपरिक स्वागत

पंतप्रधान मोदी यांचे इस्त्रायलमध्ये आगमन; बेन गुरीयन विमानतळावर भव्य पारंपरिक स्वागत

पंतप्रधान मोदी यांचे इस्त्रायलमध्ये आगमन; बेन गुरीयन विमानतळावर भव्य पारंपरिक स्वागत

पंतप्रधान मोदी यांचे इस्त्रायलमध्ये आगमन; बेन गुरीयन विमानतळावर भव्य पारंपरिक स्वागत


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज तेल अविव इथल्या बेन गुरीयन विमानतळावर आगमन झाले.

अधिकृत पारंपरिक स्वागत पद्धतीनुसार इस्त्रायलचे पंतप्रधान बेन्जामिन नेत्यनाहू यांनी मोदी यांचे विमानतळावर स्वागत केले. यावेळी पंतप्रधानांनी पारंपरिक मानवंदनाही स्वीकारली.

पंतप्रधान नेत्यानाहू यांनी आपल्या निवेदनाची सुरुवात ‘आपका स्वागत है मेरे दोस्त’ या हिंदी वाक्याने केली. आपण पंतप्रधानांचे मुक्तबाहुंनी स्वागत करीत असून, दोन्ही देशांमधले सहकार्य अमर्याद आहे, असे नेत्यनाहू म्हणाले. पंतप्रधान मोदी हे अतिशय मोठे आणि जागतिक दर्जाचे नेते असल्याचे त्यांनी म्हटले.

या आदरातिथ्याचा स्वीकार करतांना पंतप्रधान मोदी यांनी आपल्या निवेदनाची सुरुवात हिब्रु भाषेतून “शॉलोम ले कुलाम” अशा शुभेच्छा देत केली. त्या पुढेही त्यांनी हिब्रु भाषेतच “इस्त्रायलच्या भूमीत आल्याचा मला अतिशय आनंद होत आहे” अशा भावना व्यक्त केल्या.

4 जुलै रोजीच 41 वर्षांपूर्वी इस्त्रायलमध्ये झालेल्या एंटेबे कारवाईचे पंतप्रधानांनी यावेळी स्मरण केले. या कारवाईत, ओलिस ठेवलेल्या अनेक इस्त्रायली नागरिकांची सुटका करतांना नेत्यनाहू यांच्या थोरल्या बंधुंना वीरमरण आले होते.

शाश्वत गतिमान वृद्धि आणि सर्वांगीण विकासाच्या मार्गावर प्रवास करतांना भारत इस्त्रायलला अतिशय महत्वाचा भागीदार मानतो, असे पंतप्रधान म्हणाले. आर्थिक समृद्धीसाठी भागीदारी तयार करतांनाच दशहतवादाशी लढण्यासाठी संरक्षण विषयक सहकार्य वाढवण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.

इस्त्रायलमधल्या भारतीय समुदायाशी संवाद साधण्यासाठी आपण उत्सुक असल्याचे सांगत, भारतीय वंशाच्या ज्यू नागरिकांनी दिलेल्या योगदानामुळे दोन्ही देशांच्या संस्कृती समृद्ध झाल्या आहेत, असे पंतप्रधान म्हणाले.

बी. गोखले/राधिका/दर्शना