पीएम्इंडिया
आदरणीय नेते एन्डा केनी, माध्यमांचे प्रतिनिधी
आयर्लंडमध्ये येऊन मला खरोखर अतिशय आनंद होत आहे. जरी हा दौरा छोटेखानी असला तरी तो ऐतिहासिक आहे. 59 वर्षानंतर भारतीय पंतप्रधान आयर्लंडला भेट देत आहे.
तुम्ही केलेल्या स्वागताबद्दल आणि आदरातिथ्याबद्दल मी आभारी आहे. भारतासोबतची मैत्री तुम्ही ज्या शब्दांमध्ये व्यक्त केली आहे त्याबद्दल आभार.
भारत आणि आयर्लंडमध्ये बरेच साम्य आहे. दोन्ही देशांचा वसाहतवादी इतिहास सारखाच आहे. आमच्या राज्यघटनेतही समान दुवे आहेत. भारतीय राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्वे आयर्लंडच्या राज्यघटनेवरुन प्रेरित आहेत.
आयरिश तज्ज्ञांनी आम्हाला भारतीय भूगर्भ सर्वेक्षण संस्था (जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया) आणि पहिल्या भाषिक सर्वेक्षणाची भेट दिली. आज भारतीय क्रीडा साहित्याचे उत्पादक आयर्लंडची रग्बीप्रती असलेली प्रचंड आवड लक्षात घेऊन उत्पादन करतात.
रवींद्रनाथ टागोर आणि डब्ल्यु. बी. यीट्स यांच्यातील मैत्री, तसेच भगिनी निवेदिता यांचे अध्यात्मिक योगदान भारतीय आणि आयरिश जनतेमधील असलेल्या सौहार्दाचा घट्ट धागा असल्याचे दर्शवते.
आज 26, 000 भारतीय आयरिश समुदायाचा भाग आहेत. एअर इंडियाच्या कनिष्क विमानावर झालेल्या बॉम्बहल्ल्यानंतर ते विमान कायमस्वरुपी इथेच विसावले. या घटनेच्या 30 वर्षानंतर तुम्ही स्मारक बांधून त्यांचे स्मरण केल्याबद्दल तुमचे पुन्हा एकदा आभार.
त्यांच्याप्रतीच्या दाट आठवणींमध्ये, आम्ही परस्परांना घट्ट बांधून ठेवणारे बंध विसरत नाही. आमची मुल्ये, आमच्या आकांक्षा व सध्या आम्हाला कराव्या लागत असलेल्या आव्हानांचा सामनाही समान आहे.
भारत आणि आयर्लंड दरम्यान जवळीक साधणारी भागीदारी आणि सहकार्य निर्माण झाले पाहिजे.
भारत आणि आयर्लंडची अर्थव्यवस्था आशिया व युरोपमध्ये सर्वाधिक वेगाने विकसित होणारी आहे.
आम्हाला आनंद होत आहे की, जागतिक व स्थानिक पातळीवरील अनिश्चिततेच्या वातावरणातही आपला द्विपक्षीय वापर वृद्धींगत होत आहे. आपल्या आर्थिक भागीदारीत तंत्रज्ञानावरही जोर देण्याची आवश्यकता आहे- माहिती तंत्रज्ञान, जैवशास्त्र व औषधनिर्माण, कृषी आणि स्वच्छ ऊर्जा महत्वाची आहे.
भारताचे व्यापारी हितसंबंध आणि आव्हानांप्रती युरोपियन संघटनेची असलेली संवेदनशीलता यामुळे भारत-युरोपियन युनियन दरम्यान चर्चा पुन्हा सुरु करता येईल व व्यापकरित्या व्यापार आणि गुंतवणूक करार होईल.
सध्याच्या डिजीटल युगात भारत आणि आयर्लंड दरम्यान उत्पादक भागीदारीसाठी ही योग्य वेळ आहे. मला विश्वास आहे की माहिती तंत्रज्ञानाशी संबंधित संयुक्त कार्य गट लवकरच परस्पर सहकार्यासाठी आराखडा तयार करण्यासाठी एक बैठक घेईल.
भारताच्या माहिती तंत्रज्ञानक्षेत्रातील गरजा पूर्ण करण्यासाठी आयर्लंड सरकार व्हिसा धोरणाबद्दल संवेदनशीलतेने निर्णय घेईल. सामाजिक सुरक्षा करारासंदर्भातही मी आमचा रस असल्याचे कळवले आहे. यामुळे दोन्ही देशांतील व्यावसायिकांना मोठा फायदा होईल.
मला आनंद आहे की, दोन्ही देशांदरम्यान लवकरच थेट हवाई सेवा सुरू होत आहे. यामुळे केवळ आपल्या व्यावसायिक हितसंबंधानाच नाही तर पर्यटनालाही फार मोठी चालना मिळणार आहे जो प्रतिवर्षी 14 टक्क्यांनी वाढत आहे.
विज्ञान आणि तंत्रज्ञान व शिक्षण ही दुसरी क्षेत्रे आहेत की, ज्यात दोन्ही देशांदरम्यान ऐतिहासिक सहकार्य आहे व त्यात आणखी बरेच काही करण्याची आपल्याला संधी आहे. या सहकार्याचा एक भाग म्हणजे कर्नाटकमध्ये आयर्लंडचे असलेले विज्ञान केंद्र होय. मला आनंद आहे की, दहशतवाद, जहालवाद आणि युरोप व आशियातील परिस्थिती अशा आंतरराष्ट्रीय आव्हानाबाबत आपण परस्परांची मते जाणून घेतली. भारत आणि आयर्लंड समान लोकशाही मुल्यांवर आधारित आहेत त्यामुळे आमची चर्चा परस्पर सहकार्यावर अधोरेखित झाली. आंतरराष्ट्रीय शांतता आणि स्थैर्य याचा दोन्ही देशांनी नेहमीच पुरस्कार केला आहे.
यासंदर्भात आम्ही 21व्या शतकातील आव्हानांचा सामना करताना संयुक्त राष्ट्रसंघटनेची आणि सुरक्षा परिषदेची भूमिका याबाबत चर्चा केली. भारत आणि आयर्लंड शांततामोहिमेचे भागीदार देश आहेत.
शाश्वत विकास उद्दिष्टांसंदर्भातील आयर्लंडच्या नेतृत्वाबद्दल मी धन्यवाद देतो.
संयुक्त राष्ट्रसंघटनेच्या सुरक्षा परिषदेच्या एका निर्धारित वेळेत सुधारणांबाबत मी आयर्लंडच्या पाठिंब्याची इच्छा व्यक्त करतो- ज्यात संयुक्त राष्ट्रसंघटनेच्या 70 व्या वर्षात आंतरराष्ट्रीय वाटाघाटींची यशस्वी सांगता झाली. सुधारित सुरक्षा परिषदेत भारताच्या स्थायी सदस्यत्वासाठीही आम्हाला आयर्लंडचा पाठिंबा हवा आहे.
भारत आणि आयर्लंड शांतताप्रिय देश आहेत. आम्ही दोन्ही देश आण्विक प्रसारबंदीचे पुरस्कर्ते आहोत. या मुद्यावरील आयर्लंडच्या कठोर आणि तत्वनिष्ठ भूमिकेचा आम्ही आदर करतो.
स्वातंत्र्यापासूनच भारत वैश्विक पातळीवर आण्विक नि:शस्त्रीकरणासाठी आवाज उठवत आला आहे. आम्ही या उद्दीष्टाप्रती कटीबद्ध आहोत. आमची अण्वस्त्रप्रसारबंदीसाठीची विश्वासार्हता आमच्या इतिहासातून दिसून येते. 2008 मध्ये आण्विक पुरवठा गटातून भारताला काही विशिष्ट सवलत मिळण्यासाठी आयर्लंडने दिलेला पाठिंबा महत्त्वाचा होता. भारताच्या ऊर्जा क्षेत्रातील प्रचंड मागणीत शाश्वत विकासासाठी हा मोठा पर्याय आहे.
आता आण्विक पुरवठादार देश आणि इतर आंतरराष्ट्रीय निर्यात नियंत्रण संस्थांमध्ये भारताच्या सदस्यत्वासाठी आयर्लंडच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे. भारताचे सभासदत्व दोन्ही देशांमधील सहकार्य वृद्धींगत करेल आणि आंतरराष्ट्रीय अण्वस्त्रप्रसारबंदीच्या प्रयत्नांना बळकटी प्रदान करेल.
माननीय पंतप्रधान, भारत आणि आयर्लंड संबंधातील क्षमता पाहता दोन्ही देश परस्परांमध्ये अधिक गुंतवणूक करतील असा मला ठाम विश्वास आहे. आशियामध्ये तुम्ही सर्वात प्रथम भारतासोबत राजकीय संबंध प्रस्थापित केले आहेत. आम्ही आता आशियामधील तुमचा तळ आहोत. भारताच्या दृष्टीनेही आयर्लंड युरोपचे प्रवेशद्वार आणि अटलांटिकला जोडणारा सेतू आहे.
तुमच्या आदरातिथ्याबद्दल पुन्हा एकदा आभार. तुम्ही भारतभेटीवर येऊन दोन दशकांपेक्षाही जास्त कालावधी लोटला आहे. मी तुम्हाला भारतात भेटू इच्छितो.
धन्यवाद.
S.Thakur/N.Sapre
Thank you for your very warm reception and gracious hospitality: PM @narendramodi thanks Mr. @EndaKennyTD https://t.co/ZMB9gwRRFG
— PMO India (@PMOIndia) September 23, 2015
India and Ireland share much in common. Directive Principles of State Policy in Indian Constitution are inspired by Irish Constitution: PM
— PMO India (@PMOIndia) September 23, 2015
We are pleased that our bilateral trade & investment ties are growing, despite global and regional uncertainties: PM https://t.co/ZMB9gwRRFG
— PMO India (@PMOIndia) September 23, 2015
India and Ireland are ideally placed to form productive partnerships to take advantage of the opportunities in the digital age: PM
— PMO India (@PMOIndia) September 23, 2015
Exchanged views on broad range of global challenges including terror, radicalisation, and the situation in Europe and Asia: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) September 23, 2015
I have now sought Ireland’s support for India’s membership of the NSG and other international export control regimes: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) September 23, 2015
India can be Ireland's anchor in Asia & Ireland can be India's vital gateway to Europe & bridge across the Atlantic. http://t.co/Dkjc9Kt5Nb
— Narendra Modi (@narendramodi) September 23, 2015