Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फिनलँडच्या पंतप्रधानांचा दूरध्वनीवरुन संवाद


फिनलँडचे पंतप्रधान जुहा सीपीला यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरुन संवाद साधला.

वस्तू आणि सेवा कराच्या ऐतिहासिक आणि यशस्वी अंमलबजावणीबद्दल पंतप्रधान सीपीला यांनी पंतप्रधान मोदी यांचे अभिनंदन केले.

फेब्रुवारी 2016 मध्ये मुंबईत आयोजित “मेक इन इंडिया” सप्ताहात पंतप्रधान सीपीला सहभागी झाले होते. तेव्हापासूनच्या द्विपक्षीय संबंधांमधील प्रगतीबाबत दोन्ही नेत्यांनी आढावा घेतला, तसेच द्विपक्षीय व्यापर आणि गुंतवणूकविषयक संबंध अधिक दृढ करण्याच्या पर्यायांबद्दल चर्चा केली.

B.Gokhale/M.Pange/Anag