Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

भारतीय विमानतळ प्राधिकरणाची लखनौ येथील चौधरी चरणसिंग आंतरराष्ट्रीय विमानतळस्थित 1899 चौ.मी. जमीन लखनौ मेट्रो रेल्वे महामंडळाला कायमस्वरूपी हस्तांतरित करायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने भारतीय विमानतळ प्राधिकरणाची लखनौ येथील चौधरी चरणसिंग आंतरराष्ट्रीय विमानतळस्थित 1899 चौ.मी. जमीन लखनौ मेट्रो रेल्वे महामंडळाला कायमस्वरूपी हस्तांतरित करायला मंजुरी दिली आहे.

लखनौ मेट्रो महामंडळाला मेट्रो स्थानकासाठी प्रवेश/ निर्गमन व्यवस्था उभारण्यासाठी या जमिनीची आवश्यकता होती. हा वाहतुकीचा महत्वपूर्ण प्रकल्प असून यामुळे सामान्य नागरिकांची सोय होणार आहे.

N.Sapre/S.Kane/P.Kor