पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत दुहेरी कर आकारणी टाळण्यासाठी व उत्पन्नावरील करातील चोरी थोपविण्यासाठी भारत व व्हिएतनाम दरम्यान झालेल्या कराराच्या दुरुस्ती करणाऱ्या प्रोटोकॉलला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.
या प्रोटोकॉलमध्ये कर संबंधी माहितीच्या योग्य पद्धतीने देवाण-घेवाणीसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वीकृती प्राप्त मानकांचा उल्लेख आहे; ज्यामध्ये बँक माहिती तसेच गैरस्थानिक कर हिताची माहिती देखील समाविष्ट आहे. यामध्ये याचाही उल्लेख आहे की एखाद्या भारतीय रहिवाशासंबंधी व्हिएतनामकडून जी माहिती मिळेल, त्याला व्हिएतनामच्या सक्षम प्राधिकरणाची स्वीकृती मिळाल्यानंतर इतर कायदा प्रवर्तन संस्थांना दिली जाऊ शकते. अशाचप्रकारे व्हिएतनामच्या एखाद्या रहिवाशासंबंधी भारताकडून जी माहिती मिळेल, त्याला भारताच्या सक्षम प्राधिकरणाकडून मान्यता मिळाल्यानंतर इतर कायदा प्रवर्तन संस्थांना ती माहिती देता येऊ शकेल.
S. Pophale/S.Tupe