Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

भारत आणि अर्मेनिया यांच्यात सीमाशुल्क विषयक बाबींमध्ये सहकार्य करण्याच्या कराराला मंत्रिमंडळाची मान्यता


भारत आणि अर्मेनिया यांच्यात सीमाशुल्क विषयक बाबीमध्ये, परस्पर सहाय्य आणि सहकार्य करण्याच्या करारावर स्वाक्षरी करण्याला आणि हा करार मंजूर करायला केंद्रीय मंत्री मंडळाने मान्यता दिली आहे.

संबंधित सरकारांनी मान्यता दिल्यानंतर या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात येतील. करारासाठी आवश्यक त्या सर्व राष्ट्रीय कायदेविषयक बाबींची पूर्तता करण्यात आल्याचे राजनैतिक अधिकाऱ्यांच्या माध्यमातून स्पष्ट झाल्यानंतर हा करार अस्तित्वात येईल.

सीमा शुल्क विषयक गुन्हे रोखण्यासाठी आणि या गुन्ह्याबाबत तपास करण्यासाठी आवश्यक ती माहिती उपलब्ध होण्यासाठी हा करार उपयुक्त ठरणार आहे. दोन्ही देशातला व्यापार यामुळे सुलभ होणार आहे.

पूर्वपीठिका

उभय देशातल्या सीमा शुल्क अधिकाऱ्यांमध्ये संबंधित आणि गुप्त माहिती पुरवण्यासाठी या करारामुळे कायदेशीर चौकट प्राप्त होणार आहे. त्याचबरोबर सीमाशुल्क कायद्याची अंमलबजावणी, सीमाशुल्क विषयक गुन्हे रोखण्यासाठी आणि वैध व्यापारासाठीही हा करार उपयुक्त ठरणार आहे. दोन्ही देशांच्या सीमा शुल्क प्रशासनांनी एकमताने या कराराचा मसुदा तयार केला आहे.

N.Sapre/N.Chitale/P.Kor