पीएम्इंडिया
कौशल्य विकास, व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण या क्षेत्रात सहकार्य करण्यासाठी ब्रिटन तसेच उत्तर आयर्लंड समवेतच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे.
कौशल्यविकास, व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण या क्षेत्रात उभय देशात घनिष्ठ द्विपक्षीय सबंधाना यामुळे वाव मिळणार आहे. दुसऱ्या देशाशी सहयोगामुळे भारतीय युवकांच्या कौशल्य विकासाला चालना मिळून त्यांना रोजगाराच्या उत्तम संधी प्राप्त व्हायला मदत होणार आहे.
भारत आणि युनायटेड किंगडम, उद्योग आणि प्रशिक्षण संस्था यांच्यातल्या कल्पक भागीदारीसाठी या सामंजस्य करारामुळे ढाचा निर्माण करण्यात येणार आहे. या सामंजस्य कराराच्या अंमलबजावणी विषयक प्रकल्पाच्या निधीची व्यवस्था, दोन्ही देशांनी परस्पर सहमतीने केलेल्या वेगळ्या व्यवस्थेनुसार करण्यात येईल.
पूर्वपीठीका
कौशल्य विकासाला भारताने राष्ट्रीय प्राधान्य दिले असून, युनायटेड किंगडम हे राष्ट्र द्विपक्षीय भागीदारीचा महत्वाचा भाग आहे. नोव्हेंबर 2016 मध्ये उभय देशांच्या पंतप्रधानांनी, कौशल्य विकास आणि उद्योजकता हे सह्योगासाठीचे प्राधान्य क्षेत्र असल्याचे नमूद केले होते.
BG/NC