पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने भारत आणि जॉर्डन दरम्यान सीमा शुल्काशी निगडित मुद्यांवर सहकार्य आणि परस्पर प्रशासकीय सहकार्याबाबतच्या करारावर स्वाक्षरी करायला मंजुरी दिली आहे.
या करारामुळे सीमा शुल्कशी संबंधित गुन्हे रोखण्यास आणि त्यांचा तपास करण्यासाठी उपयुक्त माहिती उपलब्ध होण्यास मदत मिळेल. तसेच या करारामुळे दोन्ही देशांदरम्यान व्यापार वाढण्याची आणि व्यापार केल्या जाणाऱ्या वस्तूंना जलद मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.
N.Sapre/S.Kane/D.Rane