Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 आणि 29 जुलै रोजी लखनौला भेट देणार


 

पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 आणि 29 जुलै रोजी लखनौला भेट देणार आहेत. 28 जुलै रोजी ते ‘ट्रान्सफॉर्मिंग अर्बन लॅण्डस्केप’ या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. शहरी विकासाशी संबंधित सरकारच्या तीन महत्त्वपूर्ण उपक्रमांच्या तिसऱ्या वर्षपूर्ती निमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात प्रधानमंत्री आवास योजना, अमृत योजना आणि स्मार्ट सिटी मिशनचा समावेश आहे.

पंतप्रधान शहर विकास विषयक पथदर्शी मोहिमांवर आधारित प्रदर्शनाला भेट देतील. तसेच शहरांसाठीच्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या (प्रत्येक राज्य/केंद्रशासित प्रदेशातील एक) 35 लाभार्थींशी संवाद साधतील.

उत्तर प्रदेशच्या विविध शहरांमध्ये या योजनेच्या लाभार्थिंकडून व्हिडिओ लिंकच्या माध्यमातून पंतप्रधान अभिप्राय घेतील.

उत्तर प्रदेशात पथदर्शी मोहिमेअंतर्गत विविध प्रकल्पांची पायाभरणी पंतप्रधान करतील. ते उपस्थितांना संबोधितही करणार आहेत.

उत्तर प्रदेशमध्ये गुंतवणूकदाराला आकर्षिक करण्यासाठी आणि औद्योगीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने फेब्रुवारी 2018 मध्ये उत्तर प्रदेश गुंतवणूकदार संमेलनाचे आयोजन केले होते. या माध्यमातून राज्यात नवीकरणीय ऊर्जा, पायाभूत सुविधा, ऊर्जा, माहिती तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक उत्पादन, पर्यटन अशा विविध क्षेत्रांमध्ये 4.28 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे.

काही महिन्यातच 81 प्रकल्पांसाठी 60 हजार कोटी रुपये गुंतवणुकीचे प्रस्ताव समोर आले आहेत. 29 जुलै रोजी या प्रकल्पांच्या भूमीपूजन समारंभाला पंतप्रधान उपस्थित राहणार आहेत.

 

B.Gokhale/M.Pange/P.Kor