पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत “आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्था-महासागर ऊर्जा यंत्रणेचा” (आयईए-ओईएस) सदस्य देश होण्यासाठी मंजुरी देण्यात आली. पृथ्वी विज्ञान मंत्रालयांतर्गत येणारी पृथ्वी रचना विज्ञान संस्था – राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान संस्था सदस्यत्वासाठी प्रमुख संस्था असेल.
आयईए-ओईएस यांचा सदस्य झाल्यामुळे भारताला महासागर ऊर्जा क्षेत्रासंबंधी जगभरातले अद्ययावत तंत्रज्ञान मिळू शकेल, तसेच संशोधन व विकास पथकांचे सहाय्य मिळू शकेल. सदस्य देशांच्या संस्थांसोबत संयुक्त सहकार्य उपक्रम हाती घेता येऊ शकतील.
S.Kulkarni/S.Tupe/M.Desai