Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

काबूलमधल्या अफगाण संसद भवनासाठी सुधारित 969 कोटी रुपयांचा अंदाज


काबूलमधल्या अफगाण संसद भवनाचे काम 969 कोटी या सुधारित प्रकल्प अंदाजासह 31 डिसेंबर 2015 पर्यंत पूर्ण करण्याच्या निर्णयाला केंद्रीय मंत्रिमंडळानं आज पूर्वलक्षी प्रभावाने मान्यता दिली.

अफगाणिस्तानची परंपरा आणि मूल्यं लक्षात घेऊन या संसद भवनाचे काम पूर्ण करण्याचे या प्रकल्पात नमूद करण्यात आले आहे. अफगाणिस्तानमधल्या पूनर्वसन आणि पुनर्रचनेच्या भारताच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून हे संसद भवन भारत उभारत आहे. अफगाणिस्तानमध्ये लोकशाही पुनर्स्थापित होऊन ती दृढ व्हावी यासाठी भारताचे हे योगदान आहे. डिसेंबर 2015 मध्ये अफगाण संसद भवनाचे काम पूर्ण झाले. भारत-अफगाणिस्तान विकास सहकार्याअंतर्गत हे काम हाती घेण्यात आले होते. यामध्ये काही किरकोळ कामे ध्‍वनी व्यवस्थाविषयक कामे सध्या सुरु असून 31 मार्च 2016 पर्यंत ही इमारत अफगाणिस्तानकडे सुपूर्द करण्यात येईल.

N.Chitle/S. Tupe/M. Desai