Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

राज्यसभेत 124 वे घटनादुरुस्ती विधेयक संमत झाल्याबद्दल पंतप्रधानांकडून आनंद व्यक्त


राज्यसभेत 124 वे घटनादुरुस्ती विधेयक संमत झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे. राज्यसभेत 124वे घटनादुरुस्ती विधेयक 2019 संमत झाल्याने आनंद झाला आहे. या विधेयकाला मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळाल्याचे पाहून संतोष झाला. सदनात यावर जोरदार चर्चा झाली अनेक सदस्यांनी आपली अभ्यासपूर्ण मते मांडली.

124 वे घटनादुरुस्ती विधेयक 2019, संसदेच्या दोन्ही सदनात संमत होणे हा सामाजिक न्यायाचा विजय आहे. यामुळे आपले नैपुण्य दाखविण्यासाठी आणि भारतात परिवर्तन घडविण्याकरता योगदान देण्यासाठी युवा शक्तीला अधिक वाव मिळणार आहे.

124 वे घटनादुरुस्ती विधेयक 2019 संमत करून मजबूत आणि सर्वसमावेशक भारताचे स्वप्न पाहिलेल्या आपल्या घटनाकारांना आणि थोर स्वातंत्र्यसैनिकांना आपण आदरांजली व्यक्त केल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

S.Tupe/N.Chitale/P.Kor