Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

भारत आणि ब्राझील दरम्यान पारंपरिक औषध प्रणाली आणि होमियोपॅथी क्षेत्रात सहकार्याबाबत सामंजस्य कराराला मंत्रिमंडळाची मंजुरी


पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने आज भारत आणि ब्राझील दरम्यान पारंपरिक औषध प्रणाली आणि होमियोपॅथी क्षेत्रात सहकार्याबाबत सामंजस्य कराराला मंजुरी दिली आहे.

लाभ :

या करारामुळे पारंपरिक औषध प्रणाली क्षेत्रात भारत आणि ब्राझील दरम्यान सहकार्य वाढेल. भारत आणि ब्राझील यांचा सामायिक वारसाचा विचार करता हा करार उभय देशांसाठी अतिशय महत्वाचा ठरेल.

B.Gokhale/S.Kane/P.Malandkar