Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

कोळसा मंत्रालयात राष्ट्रीय प्राधिकारी पदनिर्मितीला मंत्रिमंडळाची मंजुरी


कोळसा मंत्रालयात नामनिर्देशित प्राधिकरणाला सहाय्य करण्यासाठी राष्ट्रीय प्राधिकारी या पदाच्या निर्मितीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.

या पदनिर्मितीमुळे कोळसा खाण (विशेष तरतूद) अधिनियम 2015 अंतर्गत, या अधिनियमाची उद्दिष्टये साध्य करण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय प्राधिकारी कार्यालयाचे कामकाज सुरळीत चालणे सुलभ होणार आहे.

कोळसा क्षेत्राला प्रभावित करणाऱ्या अनिश्चित समस्या सोडवून कोळशाच्या उपलब्धतेत सुधारणा करणे आणि परिणामी अर्थव्यवस्थेच्या विकासाला गती देण्याचे काम नामनिर्देशित प्राधिकरण करीत असून, नवे पद त्या कामी सहाय्य करणार आहे.

M.Pange/S. Tupe/ M. Desai