Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

विशेष आर्थिक क्षेत्र कायदा, 2005 मध्ये सुधारणा करण्यासाठी अध्यादेश आणायला मंत्रिमंडळाची मंजुरी


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने विशेष आर्थिक क्षेत्र कायदा, २००५ च्या कलम २ च्या उपकलम ५ नुसार व्यक्तीची व्याख्या सुधारून त्याऐवजी ट्रस्टचा समावेश करण्यासाठी अध्यादेश आणायला मंजुरी दिली आहे. यामुळे कुठल्याही ट्रस्टला विशेष आर्थिक क्षेत्रात आपली शाखा स्थापन करण्याचा अधिकार मिळेल. तसेच केंद्र सरकारला वेळोवेळी अधिसूचना जारी करून कुठल्याही संस्थेला ‘व्यक्ती’च्या व्याख्येत समाविष्ट करण्याची सूट मिळेल.

प्रभाव:

विशेष आर्थिक क्षेत्र (सेज) कायदा , 2005 अंतर्गत सध्या कुठल्याही ट्रस्टला सेझमध्ये आपली संस्था उभारण्याची परवानगी नाही. कायद्यात दुरुस्ती केल्यामुळे कुठल्याही ट्रस्टला सेझमध्ये संस्था उभारण्याची परवानगी मिळेल.त्याशिवाय केन्द्र सरकार वेळोवेळी अधिसूचना जारी करून कुठल्याही संस्थेला ‘व्यक्ती’च्या व्याख्येत समाविष्ट करू शकेल. यामुळे विशेष आर्थिक क्षेत्रात गुंतवणुकीला चालना मिळेल.

B.Gokhale/S.Kane/P.Kor