Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ घाणी यांच्यामध्ये दूरध्वनीवरुन संवाद


अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ घाणी यांनी 15 मार्च 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरुन संवाद साधला.

राजकीय आणि आर्थिक क्षेत्रासह विविध क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठीच्या विविध उपाययोजनांवर दोन्ही नेत्यांनी चर्चा केली. यावेळी उभय नेत्यांनी आपापल्या क्षेत्रातील विकसित होणाऱ्या परिस्थिती बाबतच्या मतांची देवाणघेवाण केली.

S. Mhatre / S.Tupe / M. Desai