Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांची श्रीलंकेच्या राष्ट्रपती आणि पंतप्रधानांशी चर्चा, दहशतवादी हल्ल्यात ठार झालेल्यांविषयी व्यक्त केल्या शोकसंवेदना


श्रीलंकेत झालेल्या भीषण बॉम्बस्फोटांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीलंकेचे राष्ट्रपती आणि पंतप्रधानांशी दूरध्वनीवरून चर्चा केली. तसेच या हल्ल्यात बळी पडलेल्यांच्या कुटुंबियांप्रती भारतीयांच्या वतीने शोकसंवेदना व्यक्त केल्या. या हल्ल्यात 200 हून अधिक नागरिकांचा बळी गेला आहे.

पंतप्रधानांनी या दहशतवादी साखळी बॉम्बस्फोटांचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. धार्मिक स्थळांना लक्ष्य करणारा हा दहशतवादी हल्ला हा एक नृशंस आणि पूर्वनियोजित क्रूर कृत्य असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे. या अशा हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर समाज, मानवता, धर्म आणि एकूणच जगासमोर दहशतवादाचे गंभीर आव्हान असल्याचा पुनरुच्चार पंतप्रधानांनी केला.

दहशतवादाशी लढण्यासाठी श्रीलंकेला सर्व प्रकारची मदत केली जाईल, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले.

या हल्ल्यात जखमी झालेल्यांना लवकरात लवकर बरे व्हावे यासाठी प्रार्थना करत जखमींवर उपचारासाठी देखील भारत सहकार्य करेल, असे आश्वासन मोदी यांनी दिले.

N.Sapre/R.Aghor/P.Kor