पीएम्इंडिया
तेलंगण राज्य सरकारद्वारे रस्ते रुंदीकरणासाठी केंद्रीय जल आयोगाची पूर्वेकडील 372 चौरस यार्ड जमीन अधिग्रहित करायला, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. यासाठी कुठलेही शुल्क देय नसेल.
विकसित मार्ग केंद्रीय जल आयोगासाठीही उपयुक्त ठरेल. प्रदान करण्यात आलेल्या जमिनीवर उत्कृष्टता केंद्र उभारण्याचा प्रस्ताव आहे.
N.Sapre/S.Kakade/D. Rane