Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

स्टॅन्ड अप इंडिया उपक्रमाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या नोएडा इथे प्रारंभ करणार


पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या नोएडा इथे स्टॅण्ड अप इंडिया उपक्रमाचा प्रारंभ करणार आहेत. या उपक्रमामुळे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि महिला उद्योजकतेला प्रोत्साहन मिळणार आहे. या उपक्रमांतर्गंत या उद्योजकांना दहा लाख ते शंभर लाखापर्यंतचे कर्ज मिळण्याची सुविधा आहे. या उपक्रमासाठीच्या वेब पोर्टलचही पंतप्रधान उद्‌घाटन करणार असून त्याद्वारे ऑनलाईन रजिस्ट्रेशन करता येणार आहे. पाच हजार एकशे ई रिक्शानांही पंतप्रधान हिरवा झेंडा दाखवतील. कौशल्य विकास केंद्राचं उद्‌घाटन करण्याबरोबरच लाभार्थींबरोबरही ते संवाद साधणार आहेत.

N.Chitle /I.Jhala / M. Desai