पीएम्इंडिया
आज जी दुर्घटना घडली, ती खूपच दु:खदायक आहे. अशा प्रकारे मृत्यू येऊ शकतो याची कोणीही कल्पना करु शकत नाही आणि एवढया मोठया संख्येने गंभीर जखमी झालेले लोक.. ज्या ठिकाणी दुर्घटना घडली, ते ठिकाण मी पाहिले, त्या मंदिरात गेलो होतो. कोल्लममधील रुग्णालयात गेलो, येथील मुख्यमंत्र्यांशी बोलणे झाले, ज्या कुटुंबांनी आपले नातेवाईक गमावले आहेत, त्यांच्याप्रती माझ्या संवेदना. जे जखमी झाले आहेत, ते लवकर बरे होवोत, अशी माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे.
मी मुख्यमंत्र्यांना सांगितले आहे, की जे गंभीर रुग्ण आहेत, त्यांना जर मुंबई, दिल्ली कुठेही हलवायचे असेल, तर भारत सरकार त्याची व्यवस्था करील. या संकटाच्या काळात भारत सरकार भारत सरकार पूर्णपणे केरळ सरकारच्या सोबत आहे, दु:खी कुटुंबियांसोबत आहे, ही दुर्घटना एवढी भयंकर आहे की, तिचे शब्दात वर्णन करणे अशक्य आहे. दोन-दोनशे मीटर्स अंतरापर्यंतच्या लोकांना जखमा झाल्या आहेत. आताच मला डॉक्टर सांगत होते की काही स्फोट असे होते की शरीर आणि डोके वेगवेगळे झाले होते. ही केवढी भयंकर दुर्घटना असेल, याचा अंदाज मी लावू शकतो.
परंतु या दु:खद प्रसंगी भारत सरकार पूर्णपणे केरळ सरकारच्या सोबत आहे, दु:खी कुटुंबांसोबत आहे. आणि त्या कुटुंबियांसोबत, केरळच्या जनतेसोबत राहून पूर्ण मदत करेल.
J.Patnakar/S.Tupe/M.Desai