Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

राष्ट्रीय कृषी बाजाराच्या ई-नॅमचा पंतप्रधानांच्या हस्ते शुभारंभ

राष्ट्रीय कृषी बाजाराच्या ई-नॅमचा पंतप्रधानांच्या हस्ते शुभारंभ

राष्ट्रीय कृषी बाजाराच्या ई-नॅमचा पंतप्रधानांच्या हस्ते शुभारंभ


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रीय कृषी बाजाराच्या ई-नॅम या ई-व्यापार मंचाच्या शुभारंभ प्रसंगी उपस्थित शेतकऱ्यांना संबोधित केले.

आठ राज्यातले 21 बाजार आजपासून ई-नॅम मध्ये सहभागी झाले आहेत.

या उपक्रमामुळे पारदर्शकता येईल, ज्याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल, असे त्यांनी सांगितले.
कृषक समाजासाठी हे परिवर्तनाचे पाऊल असल्याचे नरेंद्र मोदी यांनी सांगितले. कृषी क्षेत्राकडे सर्वंकष नजरेने पाहण्याची गरज आहे आणि त्यानंतरच शेतकऱ्यांचा सर्वाधिक फायदा सुनिश्चित करता येईल.

सरकारने हाती घेतलेल्या विविध उपक्रमांची तसेच कृषी उत्पन्न वाढवण्यासाठी आणखी काय करता येईल ? या विषयाची माहिती पंतप्रधानांनी शेतकऱ्यांना दिली.

J.Patnakar/N.Sapre