Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान उद्या कटरा दौऱ्यावर


पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या जम्मू-कश्मिर मध्ये कटरा येथे भेट देणार आहेत.

तेथील श्री माता वैष्णोदेवी नारायण अति विशेष रुग्णालयाचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्‌घाटन होईल, तसेच श्री माता वैष्णोदेवी विद्यापीठाच्या पाचव्या पदवीदान समारंभाला पंतप्रधान संबोधित करतील. पंतप्रधान कटरा येथील एका क्रीडा संकुलाचे उद्‌घाटन करणार असून, सार्वजनिक सभेलाही संबोधित करणार आहेत.

M.Pange/S.Tupe/ M. Desai