Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

सामाजिक कार्यकर्त्या पूर्णिमाबेन पकवासा यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांना खेद


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामाजिक कार्यकर्त्या पूर्णिमाबेन पकवासा यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे.

“पूर्णिमाबेन पकवासा यांच्या निधनाचे वृत्त ऐकून दु:ख झाले. त्या एक अद्‌भुत व्यक्तिमत्त्व होत्या. ज्यांनी आदिवासी मुलींच्या शिक्षणासाठी असाधारण कार्य केले.

पूर्णिमाबेन दीर्घायुषी होत्या, वयाच्या 103 व्या वर्षी त्या आपल्याला सोडून गेल्या. जेव्हा जेव्हा मी सापुताऱ्याला जायचो, तेव्हा त्यांच्याशी झालेल्या भेटी मला आठवतात. दिवंगत पूर्णिमाबेन यांची कन्या सोनल मानसिंग यांच्याशी मी बोललो आणि माझ्या शोकसंवेदना व्यक्त केल्या” असे पंतप्रधान म्हणाले.

S.Kane / B. Gokhale