Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

संयुक्त राष्ट्राच्या आमसभेच्या निमित्ताने पंतप्रधानांनी बेल्जियमच्या पंतप्रधानांची घेतली भेट


संयुक्त राष्ट्राच्या आमसभेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 सप्टेंबर 2019 रोजी बेल्जियमचे पंतप्रधान चार्ल्स मिशेल यांची न्यूयॉर्क येथे भेट घेतली. मिशेल यांची युरोपियन परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले.

दोन्ही नेत्यांनी भारत-बेल्जियम दरम्यानच्या उत्तम संबंधांचा आढावा घेतला तसेच बेल्जियमच्या राजांच्या 2017 मधल्या भारत दौऱ्यादरम्यान घेण्यात आलेल्या निर्णयांचा पाठपुरावा केला.

भारत आणि युरोपीय संघटनेतील धोरणात्मक आणि सुरक्षा संबंध अधिक दृढ करण्याबाबत त्यांनी चर्चा केली.

15वी भारत-युरोपीय संघ शिखर परिषद लवकरात लवकर आयोजित करण्याबाबत दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शवली.

**************

B.Gokhale/S.Kane/D.Rane