पीएम्इंडिया

सिंगापूरचे उपपंतप्रधान आणि वित्तमंत्री हेंग स्वे केट यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
उपपंतप्रधान केट यांनी पंतप्रधान ली सिएन लूंग आणि ज्येष्ठ मंत्री गोह चोक टोंग यांचा संदेश पंतप्रधान मोदी यांना दिला. पंतप्रधान मोदी यांनी सिंगापूरच्या या नेत्यांसोबत झालेल्या आपल्या संरचनात्मक बैठकींना उजाळा दिला आणि या नेत्यांना शुभेच्छा दिल्या.
गेल्या महिन्यात न्यूयॉर्क इथे संयुक्त राष्ट्रांमध्ये, महात्मा गांधींच्या 150 व्या जयंतीनिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात पंतप्रधान ली सिएन लूंग यांच्या सहभागाचे पंतप्रधान मोदी यांनी कौतुक केले.
उपपंतप्रधान केट यांनी, भारत सरकारने परिवर्तनासाठी उचललेल्या पावलांचे कौतुक केले. पायाभूत सुविधांच्या गुंतवणुकीत होत असलेल्या वाढीचे त्यांनी कौतुक केले. तंत्रज्ञान क्षेत्रात भारत आणि सिंगापूर यांच्यातील वाढत्या सहकार्याचा, तसेच फिनटेकचा उल्लेख त्यांनी केला.
दोन्ही देशात वृद्धिंगत होत असलेल्या व्यापारी संबंधांबाबत आणि वाढत्या गुंतवणुकीबाबत पंतप्रधान मोदी यांनी आनंद व्यक्त केला. सिंगापूरमध्ये रुपे कार्ड आणि भीम ॲप सुरु झाल्यामुळे वित्तीय व्यवहार अधिक सुलभ झाल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. चेन्नई इथे झालेल्या दुसऱ्या संयुक्त हॅकेथॉनच्या यशाचा, सिंगापूरच्या विद्यार्थ्यांच्या त्यातील सहभागाचा त्यांनी उल्लेख केला. हे सहकार्य दोन्ही देशांमधील वाढती घनिष्ठ सामुदायिक, व्यापारिक आणि नावीन्यपूर्ण शोधातील भागीदारीचे प्रतिक असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले.
N.Sapre/S.Kakade/D.Rane
Had excellent deliberations with Deputy Prime Minister and Minister for Finance of Singapore Mr. Heng Swee Keat. We exchanged views on ways to boost trade and cultural ties between India and Singapore. https://t.co/zLZr1kWgzo
— Narendra Modi (@narendramodi) October 4, 2019