Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

जपानचे माजी पंतप्रधान यासुहिरो नाकासोने यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून शोक व्यक्त


ज्येष्ठ राजकारणी आणि जपानचे माजी पंतप्रधान यासुहिरो नाकासोने यांच्या निधाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.

“मुरब्बी राजकारणी आणि जपानचे माजी पंतप्रधान यासुहिरो नाकासोने यांच्या निधनाचे वृत्त समजले., त्यांच्या कुटुंबियांप्रति मी माझ्या शोकसंवेदना व्यक्त करतो. भारत-जपान यांच्यात चर्चेची दारे सुरु करण्यासाठी त्यांनी केलेला जपान दौरा कायम स्मरणात राहील. त्यांच्या रूपाने तब्बल 23 वर्षांनी जपानचे पंतप्रधान भारतात आले होते.

भारत आणि जपान दरम्यानचे द्वीपक्षीय संबंध दृढ करण्यात यासुहिरो नाकासोने यांचे मोठे योगदान होते. तत्कालीन भारत- जपान संबंधाचे शिल्पकार म्हणून त्यांचे योगदान कायम स्मरणात राहील. ” असे पंतप्रधान मोदी यांनी म्हंटले आहे.

S.Tupre/R.Aghor/P.Kor