Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

“Creative India; Innovative India: रचनात्मक भारत; अभिनव भारत”


भारतातील बौध्दिक संपदेच्या भविष्यातील रचनेची पायाभरणी करणाऱ्या राष्ट्रीय बौध्दिक संपदा हक्क धोरणाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूरी दिली. भारतातील रचनात्मक आणि नाविन्यपूर्ण ऊर्जा प्रवाहांना अधिक चांगल्या आणि उज्ज्वल भवितव्याची दिशा देण्याच्या दृष्टीने हे धोरण उपयुक्त आहे.

सर्व प्रकारच्या बौध्दिक संपदा आणि संबंधित संस्थांमध्ये समन्वय निर्माण करण्याच्या दृष्टीने हे धोरण कार्यरत राहील. अंमलबजावणी देखरेख आणि आढाव्यासाठी संस्थांत्मक यंत्रणा या भूमिकेतून हे धोरण कार्यरत राहील. शासकीय, संशोधन आणि विकासात्मक संघटना, शैक्षणिक संस्था, सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग, स्टार्ट अप आणि इतर भागिदारांसाठी नाविन्यपूर्ण पर्यावरण निर्माण करण्याचे काम या धोरणाद्वारे साध्य करता येईल.

मंजूरी देण्यात आलेले राष्ट्रीय बौध्दिक संपदा हक्क धोरणामुळे “रचनात्मक भारत: अभिनव भारत” ही संकल्पना अधिक चांगल्या पध्दतीने साध्य करता येईल.

M.Pange/B.Gokhale